२५ जून- शहराची खबरबात - उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार स्पर्धा

News24सह्याद्री - उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार स्पर्धा ...पहा शहराची खबरबातमध्ये...
TOP HEADLINES
*नाट्यसंकुलाच्या कामाला निधीचे सलाईन*
सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक परिसरात महानगरपालिकेच्या नाट्य संकुलाचे काम मागील आठ वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. या कामाला आता निधीच सलाईन मिळाल्याने वेग आलाय, नाट्यगृहाची आसन क्षमता ही 500 वरून एक हजारांवर वाढवण्यात आली आहे, मात्र निधीचा सलाईन संपल्यावर काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक आणि कला संचालनालयाने या कामासाठी 2010 मध्ये दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला होता, मात्र केवळ 60 लाख रुपये या कामासाठी मिळाले आहेत. या निधीतून संकुलाचा पाया खोदण्यात आला असून कॉलम उभे राहिलेत मात्र निधीअभावी या नाट्यगृहाचे काम रखडलं आहे.
No comments
Post a Comment